भाई जगताप अखेर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालेच !

@ABHIJEETRANE(AR)

भाई जगताप अखेर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालेच ! आता नेत्यांनी राडा आणि कार्यकर्त्यांनी शिवीगाळ सहन करण्याची मानसिक तयारी करून ठेवलेली बरी! स्वभावाला औषध नसतं आणि पद नसताना किंवा असताना वागणं बोलणं करणं बदलत नसत. ताप संताप मनःस्ताप पश्चात्ताप याचे नवे पर्व आता मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू होणार आहे. धमक्या आणि शिवीगाळीच्या फोनपासून पत्रकार देखील सुरक्षित असणार नाहीत .. प्रतिकूल प्रतिक्रिया देणा-यांनी येणारे मोबाईल रेकाॅर्ड करून व्हायरल करायला सिद्ध रहावे हा सल्ला!!!

www.abhijeetrane.in


@ABHIJEETRANE(AR)

मुंबई प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून मुंबईतील "अहमद पटेल " "प्रफुल्ल पटेल " "अमरसिंह " या तिघांची कंबाईंड मिनी आवृत्ती असलेले माजी आमदार चरणसिंह सप्रा यांची निवड झाली आहे. भाई जगताप यांच्या रफटफ वागण्या - बोलण्यामुळे  मुळे जे नेते-कार्यकर्ते मनाने जखमी होतील आणि सहकारी महाआघाडी पक्षातील दुखावतील त्यांच्या साठी "चरणसिंह सप्रा छाप कंडू बाम" उपयोगी पडेल हे नक्की. चरणसिंह सप्रा  माणूस चांगला सुस्वभावी सुसंस्कृत  सुसंवादी आणि विश्वासार्ह आहे पण मंत्रालयात  पब्लिक रिलेशन आणि डायनिंग करता करता मध्यस्थी करणारा दलाल अशी आपली  प्रतिमा तर होत नाही ना? हे जपावे लागेल!! 

www.abhijeetrane.in 

@ABHIJEETRANE(AR)

भारत इतर देशांकडून कोरोना लस  घेत असताना भारतीयांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण होईपर्यंत भारताने इतर देशांना लस पाठवू नये.. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे जरूर सोशल मिडीयावर प्रगट करा  !!

www.abhijeetrane.in 


@ABHIJEETRANE(AR)

 ज्या प्रकारे आता कोरोना संपलेला नसताना देखील

 लोक ऍडमिट होण्याऐवजी

 घरीच घरगुती किंवा ऑनलाईन उपचार घेऊन गुपचूप बरे होत असल्याने

 कोरोनाच्या उपचारा साठीच्या

 हजारो रूग्णांची सोय असलेल्या

 शेकडो  महाछावण्या रूग्णांअभावी प्रचंड प्रमाणात रिकाम्या पडल्या आहेत

 त्या प्रमाणे

त्याच प्रकारे 

125 कोटी भारतीयांपैकी

 जेमतेम 25/50 कोटी भारतीय कोरोना लस घेतील 

असा माझा अंदाज आहे..

 अखेर लस घेण्याची सक्ती करण्याची वेळ सरकारवर येऊ शकते ! 

जर लस घेण्याची सक्ती केली 

तर लोक आणीबाणीच्या काळात

 नसबंदी विरुद्ध जसे बंड करून उठले 

तसे प्रतिकूल प्रतिक्रिया देण्यासाठी

 रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू शकतात 

कारण आजही एकीकडे "लस यावी यासाठी वाट पहातोय"

 म्हणणारे कोट्यवधी भारतीय 

ही लस कितपत योग्य, उपयुक्त आहे

 आणि

 दुष्परिणामांची जबाबदारी कोण घेणार ?

 किंवा 'होणार नाहीत'

 याची गॅरंटी कोण घेणार ?

 याबद्दल चर्चा करताना आणि भारतीय परंपरागत संशयी स्वभावाला धरून नकारात्मक विचार करताना दिसतात..

 लसीकरण करण्याचा निर्णय शासकीय आहे..

 तो लोकप्रिय ठरेल काय???

www.abhijeetrane.in