आयडीबीआयच्या कामगारांसाठी अभिजीत राणे सरसावले

कंपनी व्यवस्थापनापुढे मांडल्या कर्मचार्‍यांच्या व्यथामुंबई



धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी कफ परेड येथील आयडीबीआय टॉवरला भेट दिली. ही भेट धडकचे नेतृत्व स्विकारलेल्या मे. आय.डी.बी.आय. बँक लि. च्या कर्मचार्‍यांच्या मागण्या सादर करण्याबाबत होती.
यावेळी अभिजीत राणे यांनी आयडीबीआयच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली आणि कर्मचार्‍यांच्या मागण्या सादर केल्या.गेल्या कित्येक वर्षांपासून आयडीबीआय बँकेत 10 ते 15 वर्षे कंत्राटी पद्धतीने भरती होत होती. याठिकाणी नियुक्त असलेल्या तरुण कर्मचारी वर्गाकडून अत्यंत तुटपुंज्या पगारावर अधिकाधिक काम करून घेतले जात असल्याचा आरोप आयडीबीआयमधील कर्मचारी वर्गाने केला आहे. याबाबत व्यवस्थापनाकडे लक्ष वेधले मात्र कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अखेर या कंत्राटी कामगारांनी आपली व्यथा धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांच्यापुढे मांडली.



अभिजीत राणे यांनीही कामगारांच्या व्यथा ऐकून घेत त्यांच्या समस्या व्यवस्थापनापुढे मांडून त्यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्‍वासन दिले. त्यानुसार आय.डी.बी.आय. टॉवर, वर्ल्ड ट्रेड सेन्टर कॉम्पलेक्स, कफ परेड, कोलाबा येथे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यवस्थापनापुढे मांडल्या. या मागण्यांमध्ये समान काम समान वेतन भेटलाच पाहिजे, कर्मचार्‍यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्तीने करताना बँकेकडूनच करण्यात यावी, यात त्रयस्थांची मध्यस्थी करण्यात येऊ नये आणि जेव्हा भरती होईल तेव्हा या कर्मचार्‍यांना कायम करण्यात यावे, विशेषतः ही नियुक्ती किती दिवसांत करण्यात येणार आहे कधी करण्यात येणार आहे याबाबत लेखी हवे,कारण काँट्रॅक्टसारखे बदलत असल्यामुळे कामगारांचा खूप तोटा होतो, लवकरात लवकर भरती काढणे आणि या कामगारांना कायम करणे, कमीत कमी महिन्याला साप्ताहिक सुट्यांच्या ऐवजी तीन भरपगारी सुट्ट्या मिळणे आवश्यक आहे, वैद्यकीय रजा वर्षाला कमीतकमी 1 महिना तरी भेटलाच पाहिजे आणि वैद्यकीय सुविधा, कुठल्याही कंत्राटी कामगारांवर अन्याय झाला नाही पाहिजे, 6 च्या नंतर सर्व कंत्राटी कामगारांना घरी जाण्याची परवानगी देण्यात यावी अन्यथा एखाद्या कामासाठी कामगारांना थांबवण्यात आल्यास ओव्हरटाईम मिळणे आवश्यक आहे, प्रत्येक महिन्याचा पगार सात तारखेच्या अगोदर एका ठराविक तारखेला कामगारांना मिळणे आवश्यक आहे आदी मागण्या सादर करण्यात आल्या.


या बैठकीच्यावेळी मे. आय.डी.बी.आय. बँक लि.चे पी.एम. सुरेश (जनरल मॅनेजर -एच.आर. डिपार्टमेंट), डेप्युटी जनरल मॅनेजर-श्रीनिवास, सेक्युरिटी हेड - शुक्ला तर विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख - धडक माथाडी जनरल कामगार युनियन), नितिन घोसाळकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष- धडक कामगार युनियन), आत्माराम गावकडकर (पालघर संपर्क प्रमुख- धडक कामगार युनियन), आय.डी.बी.आय. बँकेचे कामगार - अभिजीत जाधव, अमोल मोहिते, अमर जाधव, प्रफुल्ल मदनक आदी उपस्थित होते.