छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला


दि. 12 मार्च, 2020 रोजी छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त गोरेगाव पश्चिम,मुंबई येथे रत्ना हाॅटेल जवळ शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.


सदर कार्यक्रमात विख्यात कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव श्री अभिजीत राणे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते, त्यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी छत्रपति शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणुन गेला. या वेळी सुप्रसिद्ध पाश्र्व गायक सुदेश भोसले उपस्थित होते.


छत्रपति शिवरायांनी रायगडावर स्वराज्याचे तोरण बांधले. अनेक गड किल्ले जिंकुन त्यांनी मराठी मुलकात आपली दैदिप्यमान घोडदौड सुरु ठेवली. आज महाराष्ट्रातील आणि देशातील समस्त कामगार आणि एकुणच जनता छत्रपति शिवाजी महाराजांच्या दाखविलेल्या स्वाभिमानामुळे आज खंभीरपणे उभा राहून निधडया छातीने संकटावर मात करतो आहे, असे गौरोद्गार विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यक्त केले.



सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा तसेच कतृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मनसे शाखा क्र. 55 चे अध्यक्ष श्री शैलेंद्र मोरे यांनी केले होते.