आज दिनांक २७ फेब्रुवारी 2020 रोजी विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक श्री अनवर अहमद यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत उद्यानातील धडक कामगार युनियनचे सभासद असलेल्या वन मजूरांचे प्रलंबित प्रश्न व समस्या बद्दल व मागण्यांबाबत प्रदीर्घ चर्चा झाली व या बाबतीत लवकरच तोडगा काढून प्रश्न व समस्या व मागण्या मार्गी लावल्या जातील असे आश्वासन श्री अनवर अहमद यांनी दिले.
या प्रसंगी श्री विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) व श्री रमेश धुरी (युनिट सचिव -संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) उपस्थित होते.