प्रलंबित मागण्यांबाबत कामगार नेते अभिजीत राणेंनी केली महाव्यवस्थापकांबरोबर चर्चा
मुंबई
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियनच्या माध्यमातुन विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम करीत आहेत. आरे मध्यवर्ती दुग्धशाळेतील तसेच वरळी व कुर्ला दुग्धशाळेतील बहुसंख्य कामगारांनी अभिजीत राणे यांच्या नेतृत्व स्वीकारलेला आहे.
दि.26 फ्रेबुवारी, 2020 रोजी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव यांनी वरळी दुग्धशाळेतील महाव्यवस्थापक कुलकर्णी यांना त्यांचा दालनात भेटुन आरे दुग्धशाळेतील व्यवस्थापनेबाबत व कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली.
कर्मचार्यांचे प्रश्न व समस्या तसेच मागण्या पुढील प्रमाणे आहेत. कर्मचा-यांचे 10/20/30 वर्षाचे कालबद्ध व आश्वासित प्रगति योजनेचे आदेश अद्याप निर्गमित झालेले नाही. कर्मचा-यांचे पेड हॉलीडे, धुलाई भत्ता देण्यात आलेला नाही. या बाबत प्रभारी व्यवस्थापक आरे यांच्या दालनात दोन बैठका घेण्यात आल्या, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. अभियंत्रिकी विभागात (4 विभाग) वरळी दुग्धशाळेपेक्षा फारच कमी कर्मचारी वर्ग आहे. उदा. प्रशितन विभाग व विद्युत विभाग येथे अनुक्रमे 12 व 14 कर्मचारी उपलब्ध आहेत. परंतु आरे दुग्धशाळेमध्ये त्याच विभागात अनुक्रमे 5 व 3 कर्मचारी कामगिरी करत आहेत, कर्मचा-यांचे आरे दुग्धशाळेत त्वरीत नियुक्ति करावी. जेणे करुन दुग्ध शाळेचे काम काज करण्यास अडथळा येणार नाही.
कर्मचा-यांच्या निवासस्थानाची डागडुगी होत नाही त्या बाबत पावसाळया पूर्वी त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी. आरे दुग्धशाळेच्या अधिनिस्थ असलेली अनेक दुध केंद्र बंद आहे, ती चैकशी करुन चालू करण्यात यावी तसेच आरे पिकनिक पॉईंट येथील आरे सरिता केंद्र मागील 5 -6 वर्षापासुन बंद आहे, ते चालू करण्याबाबत योग्य ती कारवाई करुन शासनाचा महसुल वाढवावा. दुग्धशाळा ही फॅक्टरी अॅक्ट मध्ये मोडत असल्याने तिथे बंद असलेली कॅन्टीन त्वरीत सुरु करुन कामगारांच्या गैर सोय होणार नाही, या बाबत कारखाने निरीक्षक यांना आमच्या युनियन द्वारे पत्र देण्यात आले आहे, तरी त्वरीत कॅन्टीन चालू करण्याचा निर्णय घ्यावा. सेवा निवृत्त कर्मचार्यांची बरीच कामे प्रलंबित असल्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळालेला नाही, या बाबत संबंधित अधिका-यांशी चर्चा करुनही वेळेवर कामे होत नाहीत.
रिक्त असलेली सरकारी निवासस्थाने सेवा निवृत्त झालेले कर्मचा-यांना भाडे तत्वावर राहण्यास देण्यात यावी जेणे करुन शासनाच्या महसुलात वाढ होईल व अतिक्रमण होणार नाही, शिवाय वास्तुची निगा राखली जाईल. वरील सर्व विषयांवर गंभीर चर्चा करण्यात आली. वरळी दुग्धशाळेतील महाव्यवस्थापक कुलकर्णी यांनी आश्वासन दिले की सदर प्रश्न व समस्यांवर जातीने लक्ष देऊन त्वरीत तोडगा काढण्यात येईल. तसेच आरे मध्यवर्ती दुग्धशाळा बंद पडण्याबाबत ज्या अफवा उडत आहे त्या वरळी दुग्धशाळेचे महाव्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी आश्वासन दिले की आरे व वरळी दुग्धशाळा बंद पडणार नाही, त्यामुळे कामगारांमध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे तो दुर व्हावा, त्यात काही तथ्य नाही, शासन स्तरावरती असा कुठलाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही, असे आश्वासन वरळी दुग्धशाळेतील महाव्यवस्थापक कुलकर्णी यांच्याकडुन अभिजीत राणे यांना देण्यात आले.
सदर मिटींगमध्ये धडक कामगार युनियन आरे, वरळी कुर्ला युनिट कार्यकारी अध्यक्ष सदानंद माने, धडक कामगार युनियन - दुग्धशाळा अभियांत्रिकी विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रविंद्र जगताप, आरे मध्यवर्ती दुग्धशाळा युनिट अध्यक्ष सुरेश खंडागळे, संजय ठाकरे, संजय सोनावणे उपस्थित होते.