विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या जनसंपर्क कार्यालयाचे सायन माहिम लिंक रोड, बनवारी कंपाउंड, माहिम (पूर्व),मंबई येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला
माहिम (पूर्व),मंबई परिसरातील विविध कंपन्या आणि कारखान्यांमध्ये काम कारणारे कामगारांवर या पूढे कोणत्याही स्वरुपाचा अन्याय होणार नाही. श्रमिक कष्टकरी कामगारांच्या घामाला कुणी नख लावण्याचा प्रयत्न केल्यास या पूढे श्रमिक कामगार पेटून उठेल अशा इशारा धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला.
सायन माहिम लिंक रोड, बनवारी कंपाउंड, माहिम (पूर्व),मंबई येथे बुधवार, दि. 23 आॅक्टोबर, 2019 रोजी धडक कामगार युनियनच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘या परिसरात हजरो कंपन्यांमध्ये लाखो कामगार काम करीत आहे. या कामगारांना कामगार कायदान्वये कंपनी व्यवस्थापनाने जे लाभ दिले पाहिजे ते कामगारांना मिळत नाही, आपल्या रोजगारावर गदा नको म्हणुन श्रमिक कष्टकरी कामगार आपल्यावर अन्याय होत असुन सुद्धा बोलायला तयार नाही, अशा कामगारांनी अता नोकरी गमवावी लागेल याची भिती न बाळगता अन्याय विरुद्ध आवाज उठवावा, कष्टक-यांच्या घामाला योग्य न्याय देण्यासाठी धडक कामगार युनियन पाठीशी खंभीरपणे उभी राहील, अशा जबरदस्त विश्वास विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी व्यक्त केला.
या परिसरातील कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देण्यात यावा. या पुढे कामगारांवर कोणत्याही स्वरुपाचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला तेव्हा धडक कामगार युनियन जिंदाबाद, अभिजीत राणे जिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय अशो ! आदि घोषणाने परिसर दणाणुन गेला.
या कार्यकमाचे आयोजन धडक इमारत बांधकाम कामगार युनियनचे वांद्रे तालुका अध्यक्ष श्री महबूब सालम अरब (इनामदार)यांच्या सहकार्याने करण्यात आले.
या प्रसंगी श्री सलीम शेख, श्रीमती महरुनिशा शेख, श्री नावेद पटेल, श्री लाल कुरेशी, श्री अकरम अब्बासी, अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे दक्षिण मुंबई अध्यक्ष श्री धीरेन सोलंकी व धडक कामगार युनियनचे अन्य सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
Inauguration of Dhadak Kamgar Union's Public Relation office