गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, दिंडोशी कोर्टा समोर धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनची गोकुळधाम, गोरेगाव पूर्व विभाग कमिटी तर्फे मीटर रिक्शा स्टॅंण्डची सुविधा उपलब्ध करण्यात आली....
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे.
मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.
गोरेगाव पूर्व येथील जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, दिंडोशी कोर्टा समोर धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते शनिवार दि. 8 फेब्रुवारी, 2020 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले.
या रिक्शा स्टॅण्डमुळे गोकुलधाम, गोरेगाव पूर्व, मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उद्घाटन समारंभाला धडक कामगार युनियनचे अध्यक्ष श्री रामजस यादव, धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा, धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष श्री राकेश यादव, गोकुळधाम गोरेगाव पूर्व विभाग कमिटी अध्यक्ष श्री अयुब शेख, कमिटी उपाध्यक्ष श्री मलिक अर्जुन गुंजे, राजू पवार तसेच गोकुळधाम गोरेगाव पूर्व विभाग कमिटीचे सर्व कमिटी मेंबर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.