धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शास्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केलीजात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेचीगरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्या ठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झालेनाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मितीकरुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.
यादव नगर, सहकार रोड, जोगेश्वरी (पश्चिम),मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते रविवार दि. 26 जानेवारी, 2020 रोजी मीटर रिक्शास्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे यादव नगर, सहकार रोड, जोगेश्वरी (पश्चिम),मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासीवर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यादव नगर विभाग कमिटी अध्यक्ष श्री दशरथ यादव यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच यादव नगर विभाग कमिटी उपाध्यक्ष श्री विनोद यादव यांच्या हस्ते श्री विजयशंकर मिश्रा (मुंबई अध्यक्ष - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन ) यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
उद्घाटनसमारंभाला श्री अमोल राणे (सी.ई.ओ. - मे. वास्ट मिडीया नेटवर्क प्रा.लि.), अॅड. नारायण पणीकर (उपाध्यक्ष -धडक कामगार युनियन),श्री विजयशंकर मिश्रा (मुंबई अध्यक्ष - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन ), विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख -धडक माथाडी जनरल कामगार युनियन),मोहसीन शेख(मुंबई उपाध्यक्ष - धडक कामगार युनियन), श्री झुल्लुर यादव, श्री लालसाहेब यादवश्रीमती फरीदा जरीवाला, श्रीमती मंदा सोनी, यादव नगर विभाग कमिटी अध्यक्ष -श्री दशरथ यादव, कमिटी उपाध्यक्ष -श्री विनोद यादव, कमिटी सचिव - श्री रामअवतार यादव, कमिटी खजिनदार - श्री वेदप्रकाश यादव, कमिटी महासचिव - श्री श्यामपत यादव, कमिटी मंत्री -श्री अशोक यादव, कमिटी महामंत्री - श्री हरी यादव
व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.